कवठे येमाईत कोरोनाचा पुन्हा उद्रेक; 7 जण कोरोनाबाधित आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावात 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे. कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावात एकूण 24 जण कोरोनाबाधित असल्याची माहिती कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नामदेव पानगे यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधक सूचना,आवाहन अनेक नागरिक पाळताना दिसून येत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक होत आहे. कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या कवठे 7, सविंदणे 5, कान्हूर मेसाई 6, खैरेवाडी 1, शास्ताबाद 1, वरुडे 4 असे 24 जण कोरोनाबाधित आढळले असून परिसरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.