86 वर्षीच्या आजीने अवघ्या 8 दिवसांत कोरोनाला हरविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची लागण झाल्यानंतर भीतीपोटी अनेकांसमोर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो. प्रकृतीच्या चिंतेने अनेकजण हातपाय गळून बसतात. पण नीर येथील एका 86 वर्षीय आजीने जिद्दीच्या जोरावर अवघ्या आठ दिवसांत कोरोनावर मात करीत कोरोनातून लवकर बरे होऊ शकतो हे दाखवून दिले आहे. यशोदा थोपटे असे या आजीचे नाव आहे

यशोदा आपटे यांना काही दिवसांपूर्वी दम लागणे, शरीर अस्वस्थ वाटणे यांसारखा त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नीरा येथील जीवनदीप रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत न घाबरता त्यांनी कोरोनाशी लढा दिला. डॉ. रोहन लकडे आणि त्यांच्या टीमने आजींवर तातडीने उपचार सुरू केले. उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत आजीने अवघ्या आठ दिवसांत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.  थोपटे आजी आता घरी परतल्या असून अनेकजण त्यांचे कौतुक करीत आहेत.