राज्यातील 89 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

26

सामना ऑनलाईन, मुंबई

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आज अखेर झाल्या. राज्यातील 89 उपायुक्तांच्या आज बदल्या करण्यात आल्या. मुंबई पोलीस दलातील सचिन पाटील, अभिषेक  त्रिमुखे, विक्रम देशमाने व डॉ. विनयकुमार राठोड यांची मुंबईबाहेर बदली  केली असून नऊ उपायुक्तांची मुंबईत बदली झाली आहे.

गृह खात्याने राज्यातील 89उपायुक्तांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या. सोमनाथ घार्गे, डॉ. मोहनकुमार दहिकर, श्रीकांत परोपकारी, डी.एस. स्वामी, नंदकुमार टी. ठाकूर, चंदर किशोर मीना, प्रणय अशोक, रंजन शर्मा,  अंकित गोयल या उपायुक्तांची मुंबई पोलीस दलात बदली झाली आहे. तसेच महामार्ग पोलीस अधीक्षक रूपाली अंबुरे यांच्याकडे राज्यपाल सुरक्षा एसपीयूची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रवीण पाटील यांची नवी मुंबईच्या उपायुक्त गुन्हे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या