सुरेंद्र पाल आता मराठीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आज सुरेंद्र पाल यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर सिनेसृष्टीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळात त्यांनीही मराठी सिनेमात एंट्री केली आहे. शिवदर्शन साबळेंच्या ‘लगी तो छगी’ या चित्रपटात ते एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ८ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

बी. आर. चोप्रांच्या ‘महाभारत’ या मालिकेतील त्यांचा द्रोणाचार्य विसरता येणं शक्यच नाही. ते आता दिग्दर्शक शिवदर्शन साबळे यांच्या ‘लगी तो छगी’मध्ये ते पठाणाच्या भूमिकेत दिसतील. शिवदर्शन यांनी दिप्ती विचारे, स्वाती फडतरे आणि अजित पाटील यांच्या साथीने ‘लगी तो छगी’ची निर्मिती केली आहे. यात अभिजीत साटम, निकीता गिरीधर, रविंदर सिंग बक्षी, मिलिंद उके वगैरेंच्या भूमिका आहेत.