परतवारी… वैभववारी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजाभाऊ चोपदार

तुझे दर्शन झाले आता ।
जातो माघारी पंढरीनाथा ।।
तुझ्या नादाने पाहिली । मी तुझीच रे पंढरी ।।

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य म्हणजे पंढरीचा विठोबाराया. आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या ओढीने पंढरपुरी आलेला वारकरी त्याच्या दर्शनाने कृतकृत्य होत परतीचा मार्ग स्वीकारतो. पांडुरंगाचं साजिरं रूप डोळ्यांत साठवत हा वैष्णवांचा मेळा वारी चुको न दे हरीचं वचन देत-घेत मार्गस्थ होतो. यात महत्त्वाचा असतो तो मनात साठलेला भक्तीप्रेमाचा कल्लोळ. या प्रेमाच्या कल्लोळाची म्हणजेच पंढरीच्या वारीची वाट पाहणाऱया वारकऱयांना त्यांचा पांडुरंग आणि त्याचा आषाढीचा सोहळा म्हणजे अद्वैताची प्रचीती देणारा सोहळा. म्हणूनच केवळ विठोबाच्या कळसाचं दर्शन झालं तरी ’पावलो पंढरी वैकुंठभुवन’ अशी या वारकऱयाची अवस्था होते. एकादशीला अवघी पंढरी दुमदुमून जाते. बारशीची पारणे सोडली जातात. पौर्णिमेला काला होतो आणि कारकरी पुन्हा आपापल्या गाकी परतायला निघतात आणि सुरू होतो परतवारीचा सोहळा.

असा हा मुख्य वारी आणि परतवारीचा आनंदसोहळा गेली कित्येक वर्षे मी अनुभवत आहे. आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होते. माऊलींच्या पालखीचं ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून प्रस्थान होतं आणि आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात पालखी पोहचते. त्यानंतर आषाढ शुद्ध पौर्णिमेला पालखीचा परतीचा म्हणजेच परतवारीचा प्रवास सुरू होतो. जाताना लाखोंचा समुदाय माऊलींना घेऊन जातो. तर येताना १०००-१५०० वारकरी माऊलींना पुन्हा आळंदीत सोडायला येतात. या परतवारीचे नियोजन अगदी निराळे असते. या परतवारीत सोहळ्याचे प्रतिनिधित्व करणारे लोक असतातच. शिवाय प्रत्येक दिंडीतील काही व्यक्तीही सहभागी होतात. यात दिंडेकरी व विणेकऱयांचा मान महत्त्वाचा असतो. प्रत्येक दिंडीतील एक-एक प्रतिनिधी परतवारीला असतोच. याबरोबरच ३०० हून अधिक विणेकरी सामील होतात. परतीचा हा प्रवास १० दिवसांचाच असतो. यात दोन ठिकाणी मुक्काम होतो. नऊ दिवसांत आळंदीत पालखी पोहोचताना वेग दुप्पट होतो. परत येतानाचा दिनक्रम पहाटे २ ते ३ ला सुरू होतो. रोज दुपारी अल्पकाळ विसावा घेत संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी व पुन्हा पहाटे २-३ च्या सुमारास चालायला सुरुवात असा हा दिनक्रम असतो. म्हणूनच परतवारीचा वेग जास्त असतो. दिवसाला साधारण ३८-४० किलोमीटर अंतर कापलं जातंच. या परतवारीत जागराची, भोजनाची सोय असतेच त्याबरोबरच सासवड आणि पुण्याला कीर्तनाची सेवाही होते.

मध्यरात्रीच्या अंधारात केवळ रथाच्या प्रकाशात ही परतवारी निघालेली असते आणि तिला सोबत असते सुरेल भजनांची. पहाटेची वेळ, सुरेल भजन, टाळ-मृदुंगाची साथ हा मिलाफ जाणीव-नेणिवेच्या पलीकडे नेणारा असतो. म्हणूनच सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाने सुखावलेल्या जीवांसाठी ही परतवारी अधिक सुखावह ठरते. ज्ञानेश्वर माऊली पंढरपुरीच्या विठोबा माऊलींची भेट घेतात आणि दर्शन घेऊन आळंदीला माघारी निघतात. परतवारीतली ही भावनाच तिला वैभववारी बनवतात. अशी ही सुखावह वैभवीवारी आहे. माझ्यासाठीहीं परतीचं भजन हा सुखाचा सोहळा असतो. यात स्वार्थ असा की, जातानाचा बहुतांश वेळ वारींचं नियोजन करण्यात जातो मात्र येताना हा आनंद घेता येतो.

परतवारीला आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे आषाढी एकादशीनंतर चार दिवसांनी सुरूवात होते. वारीमध्ये कितीतरी मैलांची पायपीट केल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ वारकऱयाला असतेच. पण यातही अगम्यता दिसून येते. पांडुरंगाचं मुखदर्शन, कळसाचं दर्शन, चंद्रभागा स्नान आणि प्रदक्षिणा तर काही पंढरपुराच्या भूमीचं दर्शन घेऊन वारकरी निघतात. दशमीला पालखी पोहोचली की एकादशीला पालखीची नगरप्रदक्षिणा असते. द्वादशीला अनेक वारकरी परत निघतात, परंतु नियमाने वारी करणारे गोपाळापुराला काला व काल्याचे कीर्तन झाल्यावरच निघतात. अजून तरी परतवारीला फारशी गर्दी होत नाही. परतवारी नित्यनेमाने करणारेच या वारीला असतात. ही वारी वर्षातून एकदाच असते. परंतु याचबरोबर महिन्याची वारी व परतवारी करणारेही आहेत. आळंदीत असे १५० हून अधिक वारकरी आहेत जे वर्षभर अखंड आळंदी ते पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूर ते आळंदी अशी पायी वारी करतात.

विठोबाशी एकरूप झालेल्या भक्तीची असंख्य उदाहरणं पाहायला मिळतात. वारकऱयांचं तर अवघं आयुष्यच माऊलीमय झालेलं असतं. यात एका वारकऱयाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. हा नाशिकचा वारकरी माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी नाशिकहून पायी येतो. संपूर्ण वारी व परतवारीत पालखीशी सोबत करत पुन्हा नाशिकला पायी जातो. तर दिंडय़ांचीही काही उदाहरणं आहेत. पंढरपुरातील काही दिंडय़ा माऊलींना नेण्यासाठी पंढरपुरातून आळंदीला चालत येतात आणि वारीची सोबत करतात. काही वारकरी केवळ परतवारी करतात. माऊलींची सोबत करणं, भजन-कीर्तनात दंग होणं हाच त्यांचा उद्देश असतो. इथे साधकबाधक असं काहीच नसतं. विठूमाऊलीच्या चरणी लीन होत माझे जीवीची आवडी होण्याचीच ही स्थिती आहे. पांडुरंग चरणी लीन होऊन एकदा तुळशीची माळ घातली की तो देह क्रतस्थ होतो. अहंकाराचं, ’स्व’चं बीज आपोआप गळून पडतं आणि पांडुरंगाच्या सेवेत हा देह रुजू होतो. हेच तुळशीमाळेचं महत्त्व आहे. लीन होणं म्हणजे काय हे सांगणारा वारकरी संप्रदाय आहे.

पालखी दशमीला आळंदीत पोहचते. आळंदीपूसन ५ किलोमीटर अलीकडे थोरल्या पादुका म्हणून स्थान आहे. सर्व आळंदीकर माऊलींना नेण्यास तिथे जमतात. पंढरपुराहून साधारण १५०० च्या संख्येत निघालेल्या या परतवारीत पुण्याच्या पुढे १०००० पेक्षा अधिक भाविक सहभागी होतात. मंदिरात पालखी गेली की महाआरती होते व दुसऱया दिवशी एकादशीला नगरप्रदक्षिणा होते. इथे परतीला आलेल्या सर्व विणेकऱयांचा सन्मान सोहळा होतो आणि ही वारी संपन्न होते, पूर्णत्वाला जाते. हा सगळा सोहळा अवर्णनीय असतो.

वारी ही संकल्पना भगवंताची भेट घेण्यासाठी संतांच्या संगतीत काळ घालवण्याची आहे. संतांचे संगतीं मनोमार्ग गति । आकळाका श्रीपति येणें पंथें । असे हरिपाठात म्हणूनच म्हटले आहे. भगवंताला स्वतंत्र आळवण्याऐवजी संतांच्या संगतीतील त्यांची साधना वेगळा आनंद देते. ही सत्संगती समूहरूपाने प्राप्त झाल्याने किठ्ठलनामाचे किस्मरण होत नाही. तसेच तिथे सुरू असणाऱया भजन-कीर्तनातून भक्तिभाक उचंबळून येतो.

‘स्क’चा किसर हेच कारीचं गमक आहे. हे सगळं अनुभवताना मनुष्यमात्रातील दुष्टाका नष्ट करून सर्कत्र प्रेमाची पाखर करणाऱ्या निराकार, किश्वाकार देवाची संगती लाभते असंच म्हणेन मी. ‘पंढरीचा कारकरी। कारी चुको न दे हरी’ या आंतरिक ऊर्मीने कारीत आलेले कारकरी दिंडय़ा-पालख्यांमधून भक्तीचा अनुभव घेतात. त्यातून प्राप्त होणारे सुख-समाधान आणि शांती त्यांचं जीवन धन्य करतात. वारीचं, परतवारीचं हेच ऐश्वर्यधन पुढच्या आषाढीपर्यंत सोबत करत राहतं.

शब्दांकन – शुभांगी बागडे