
सामना ऑनलाईन, मुंबई
हटके चित्रपटात सॉलिड भूमिका करणाऱ्या आयुष्मान खुरानाने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ड्रीम गर्ल असं त्याच्या नव्या चित्रपटाचं नाव असून याबाबतचा एक व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या सहकाऱ्यांकडून नव्या चित्रपटासाठी आयडिया मागवत असतो, मात्र त्यातली एकही आयडिया त्याला आवडत नाही. अखेर त्याला त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या चहावाल्याकडून नवं कथानक मिळतं असं या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.
आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता आणि गजराज राव यांची मुख्य भूमिका असलेल्या बधाई हो चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मोठ्या बजेटच्या आणि तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटांना मागे टाकत या चित्रपटाने डोळे दिपवणारी कमाई करणं सुरू ठेवलं आहे. या चित्रपटाने बाहुबली-2 दी कनक्लुजन या चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या आकडेवारी नुसार ‘बधाई हो’ या चित्रपटाने सहाव्या आठवडयात 3.75 कोटींची कमाई केली आहे. बाहुबली-2 ने 6 आठवडयात 3.35 करोड इतकी कमाई केली होती.




























































