बोगमाळो समुद्रात बुडून बंगळूरुच्या युवकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

सामना प्रतिनिधी । पणजी

नव्या वर्षाचा जल्लोष सुरु असताना बोगमाळो-वास्को येथे एका 29 वर्षांच्या बंगळुरुच्या आयटी व्यावसायिकाचा सोमवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. रवीकुमार धनंजय पुजारी असे त्या युवकाचे नाव असून बंगळुरुतील युनीसीस इंडिया प्रा. लि. या कंपनीत तो कामाला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, रवीकुमार व त्याचे चार मित्र नवीन वर्ष साजरे करण्यासाठी वास्को येथे आले होते. सोमवारी दुपारी ते पाचजण बोगमाळो येथील समुद्रात उतरले होते. दुपारी 12.30 च्या सुमारास एका लाटेने रवीकुमार समुद्रात ओढला गेला. त्याच्या मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढून चिखली येथील रुग्णालयात तातडीने हलवले. तिथे त्याला मृत घोषीत करण्यात आले.