
सामना प्रतिनिधी । शिर्डी
नाताळ व नववर्षानिमित्त साईबाबांच्या झोळीत भाविकांनी कोट्यवधींचे दान टाकले आहे. 22 डिसेंबर ते 1 जानेवारी या 11 दिवसात साईबाबांच्या चरणी 14 कोटी 54 लाखांचे दान साईभक्तांनी टाकले. परंतु गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी दानात 30 लाखांची घट झाल्याचे दिसत आहे
नाताळ व नवववर्षादरम्यान शिर्डीमध्ये भाविकांची तुफान गर्दी झाली होती. बुधवारी भाविकांनी साईचरणी वाहिलेल्या दानाची मोजदाद करण्यात आली. या अकरा दिवसात साईचरणी भक्तांनी भरभरून दान दिले. भाविकांनी तब्बल साडेचौदा कोटींचे दान भाविकांनी अर्पन केले. यात रोख रक्कम, सोने, चांदीसह परकिय चलनाचा समावेश आहे.
साईभक्तांनी भरभरून दिलेले दान –
- दानपेटीत 8 कोटी
- तीन कोटींची ऑनलाईन देणगी
- साडे सोळा किलो चांदी
- 507 ग्रॅम सोने
- 19 देशांचे 64 लाखांचे परकिय चलन




























































