हिंदूंना बदनाम करण्यासाठीच काँग्रेसकडून ‘हिंदू दहशतवाद’ थिअरी- अरुण जेटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rafale-arun-jaitley

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसने केवळ मतांच्या लांगूलचालनासाठी जाणूनबुजून ‘हिंदू दहशतवाद’ थिअरी रचली. जे अस्तित्वात कधी नव्हतेच ते मांडण्यात आले. कोणताही पुरावा नसताना हिंदूंना बदनाम करण्याचा कट काँग्रेसने रचला असे टीकास्त्र केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोडले आहे.

समझौता एक्प्रेस स्फोटप्रकरणी ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने स्वामी असीमानंद यांच्यासह सर्वांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर आज अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने हिंदूंना बदनाम करण्यासाठी ‘हिंदू दहशतवादा’ची संकल्पना मांडली. काँग्रेसने केलेला हा कटच होता त्याकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले. केवळ मतांसाठी काँग्रेसने ही थिअरी मांडली. 10 वर्षे आरोपींना तुरुंगात डांबले. कोणतेही पुरावे नसलेले हे प्रकरण होते हे आता सिद्ध झाले आहे. याची जबाबदारी काँग्रेस आणि यूपीए सरकारला घ्यावी लागेल, असे जेटली यांनी सांगितले.