
सामना ऑनलाईन । ठाणे
ठाणे जिह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा 227 मतदान केंद्रांची भर पडली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी 64,888 मतदान केंद्रे होती. आता त्यांची संख्या यावेळी 65,115 इतकी होणार आहे. या मतदान केंद्रांवर 46 हजार मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असून सर्व ठिकाणी पाणी, प्रथमोपचार, पाळणाघरांसह सर्व सोयीसुविधांची व्यवस्था चोख बजावण्यात येणार आहे. तसेच तीनही मतदारसंघांसाठी लागणाऱ्या मतदान यंत्रांची क्षेत्रनिहाय सरमिसळही झाली आहे.
लोकसभा निकडणूक 2019 च्या पूर्कतयारीच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याकेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी शनिवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.




























































