पॉलिकॅबचा ‘आयपीओ’ उद्या बाजारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी | मुंबई

वायर्स, केबल्स आणि फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्समधील आघाडीची कंपनी असलेल्या पॉलिकॅब इंडिया लिमिटेडच्या 17,582,000 शेअर्सचा आयपीओ शुक्रवार, 5 एप्रिलला विक्रीला येणार आहे. प्रत्येक शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये तर प्रती शेअर्स 533 ते 538 रुपये आहे. यातील 1,75,000 शेअर्स कर्मचाऱयांसाठी राखीव आहेत.  ग्राहकांना एकावेळी किमान 27 शेअर्स तर त्यानंतर 27 पटीत शेअर्स खरेदी करता येतील. 9 एप्रिलला आयपीओची विक्री बंद होईल.