जिओला टक्कर, वोडाफोन देणार 150 जीबी जादा डेटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेलिकॉम इंडस्ट्रीत स्पर्धा लक्षणीय वाढली आहे. ग्राहक आणि महसूल वाढविण्यासाठी कंपन्या नवीन योजना आणत आहेत. व्होडाफोनने तर धमाकेदार पोस्टपेड प्लॅन आणला आहे. या प्लॅननुसार आता कंपनी ग्राहकांना 150 जीबीचा अतिरिक्त डेटा देत आहे. हा वोडाफोनचा एंट्री-लेव्हलल पोस्टपेड प्लॅन आहे.

जियोचा डॅमेज कंट्रोल, युझर्जना 30 मिनिटांचा फ्री टॉकटाईम

व्होडाफोनच्या नवीन प्लॅनची किंमत 399 रुपये आहे. यात दरमहा ग्राहकांना 40 जीबी डेटा देण्यात येत आहे. ग्राहकांना प्लॅनमधील डेटाखेरीज आणखी बरेच चांगले फायदे दिले जात आहेत. व्होडाफोनचा हा प्लॅन 200 जीबीच्या रोलओव्हर मर्यादेसह आला आहे. त्यातील सर्वात विशेष म्हणजे 6 महिन्यांसाठी 150 जीबी अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे.