
मालवण किनारपट्टीवर धडकलेले क्यार व महा चक्रीवादळ आणि त्यानंतर कोसळलेला अवकाळी पावसामुळे शेतकरी, बागायतदार व मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना देण्यात आलेली हेक्टरी आठ हजाराची नुकसान भरपाई ही तुटपुंजी आहे. त्यात वाढ होऊन किमान २५ हजार हेक्टरी मदत मिळावी, मच्छीमार बांधवांना नुकसानीची तरतूद व्हावी, सोसायट्यांकडून घेतलेले शेती व खावटी कर्ज माफ व्हावे, शेतकरी सन्मान योजना व पीक विम्याचे पैसे त्वरित मिळावेत, या मागणीसाठी मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदाराना निवेदन देण्यात आले.

































































