
- बोंबलून प्रश्न मांडू नये, आमची उत्तरं ऐकावी, बोंबलून तुमचच बिंब उघड होत आहे
- देशातील युवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे
- केंद्र सरकार युवाशक्तीला दाबण्याचा प्रयत्न करू नका, बिथरवण्याचा प्रयत्न करू नका
- युवा हे ‘बॉम्ब’ आहेत, त्यांची वात पेटवू नका
- केंद्राने दिल्लीतील विद्यार्थ्यांवर गोळीबार केला, जणू जालियनवाला बाग पुन्हा करण्याचा प्रकार आहे
- विरोधकांनी केंद्रात त्यांचच सरकार आहे, तिकडं गळा मोकळा करावा
- शिमगा करायचा असेल तर केंद्र सरकारच्या नावाने करा
- केंद्राकडून एकही पैशाची मदत शेतकऱ्यांसाठी आलेली नाही
- राज्याने साडे पंधरा हजार कोटींची मागणी केंद्राकडे केली आहे
- आधीच हा सामना चोरून वाचण्यापेक्षा उघडपणे वाचला असता तर आज आमच्याशी सामना करण्याची ही वेळ आली नसती
- सामना वाचत नाही म्हणणारे आता सामनाचेच बॅनर घेऊन आले, कालाय तस्मै नम:
- व्यथा वेदना नक्की मांडा, पण आपणच एकमेव आहोत, सत्ताधाऱ्यांना काही पडलेले नाही म्हणून दाखवण्याचा प्रकार चुकीचा
- आज जे सभागृहात झालं ते काळीमा फासण्यासारखं
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
- गोंधळातच लक्षवेधी पुकारल्यानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिल्याने सभागृह पुन्हा 15 मिनिटांसाठी तहकूब
- अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळला
- राष्ट्रवादी, भाजपचे आमदार वेलमध्ये उतरले
- जानकर यांच्या हातून काँग्रेस, राष्ट्रवादी आमदार गजभिये यांचा बॅनर खेचण्याचा प्रयत्न
- विधान परिषदेतही भाजपकडून सामनाचे बॅनर झलकवण्यात आले
- विधान परिषदेचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब
- नागरिकत्व सुधारणा विधेयक तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या 298 च्या स्थगन प्रस्तावावरून विधान परिषदेत गोंधळ
- विधानसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 पर्यंत तहकूब
- विधेयक संमतीसाठी आवाजी मतदान सुरू
- गदारोळातही विधानसभा अध्यक्षांनी कामकाज सुरू ठेवले
- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रचंड गदारोळ
- विरोधकांचा गोंधळ कायम
- भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार बोलण्यास उभे राहिले
- विरोधकांना घोषणा देण्याची प्रॅक्टीस नाही, त्यांनी आठवडाभर प्रॅक्टीस करावी – जयंत पाटील
- विरोधकांना शेतकऱ्यांचा खोटा पुळका – जयंत पाटील
- एकवीसशे कोटी जिल्ह्यांपर्यंत पोहोचले, अर्थमंत्री जयंत पाटील यांची माहिती
- कुणी कुणाच्या अंगावर धावून जाणार नाही – फडणवीस
- मुख्यमंत्री आणि सभागृहातील सदस्यांच्या समोर अंगावर धावून जाणं चुकीचं
- सभागृहात कुणाच्या अंगावर धावून जाणं ही चुकीची घटना – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
- विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू
- भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यामुळेच त्यांचे आमदार अंगावर धावून आले- जितेंद्र आव्हाड
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रेस समोर भूमिका मांडली
- विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी पुन्हा तहकूब
- जयंत पाटील आणि गिरीश महाजन उपस्थित
- विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात बैठक सुरू
- विरोधकांच्या गोंधळानंतर विधानसभेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब
- वेलमध्ये उतरलेल्या विरोधकांना जागेवर बसण्याची सूचना
- विधानसभा अध्यक्षांनी बॅनर झळकवण्यास विरोध केला

- विरोधकांचा सभागृहात गोंधळ, विरोधक वेलमध्ये उतरले
- जोपर्यंत शेतकऱ्यांना ही मदत दिली जात नाही तोपर्यंत आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही
- शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजे हा तुम्ही दिलेला शब्द – फडणवीस
- विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक
- विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात
- शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही कामकाज चालू देणार नाही – बबनराव लोणीकर
- शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, भाजपने दिल्या घोषणा
- विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांसाठी आंदोलन
- नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या याचिकेवरील सुनावणीत शरद बोबडे रामशास्त्री बाण्याने न्याय देतील- मुख्यमंत्री
जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच पद निवड पद्धत बंद होणार?