
हिंदुस्थानभरात कोरोना व्हायरसची दहशत वाढत आहे. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक सार्वजनिक ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. स्वच्छता राखण्याचे आणि प्रतिबंधात्मक उपायही करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेकडून लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या चादरी आणि खिडक्यांचे पडदे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
In the wake of #coronavirus outbreak, Western Railway decided the withdrawal of blankets & curtains from AC coaches as they are not washed every day, as a precautions against #CoronaVirusUpdates@RailMinIndia @PiyushGoyalOffc @drmbct https://t.co/VDvu731DZF
— Western Railway (@WesternRly) March 15, 2020
पश्चिम रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील वातानुकूलित डब्यांमध्ये देण्यात येणारे चादरी, पडदे इत्यादी काढून घेण्याचं निश्चित केलं आहे.
याचं कारण, ते या चादरी आणि पडदे रोज धुतले जात नाहीत. त्यामुळे फैलाव टाळण्यासाठी ते न पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर नेटकऱ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर काहींनी ट्रेनमधील अस्वच्छतेवर टीका केली आहे.






























































