
राज्यातील ग्रामपंचायतींना आमसभेची परवानगी देणार असल्याचे मदत पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. यामुळे गावपातळीवर विकास कामे सुरू करण्यासाठी यामुळे चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. चंद्रपूरमध्ये ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी फसल्याची कबुली त्यांनी दिली असून, कोरोना काळ संपल्यावर दारूबंदी उठविण्याच्या ठोस हालचाली केल्या जाणार असेही वडेट्ट्टीवर म्हणाले.
राज्याचे मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात बोलताना राज्यातील ग्रामसभांना आमसभेची परवानगी देणार असल्याचे म्हटले आहे. कोविड कारणांमुळे या आमसभा रखडल्या होत्या. गावपातळीवरील विकासकामांना चालना देण्यासाठी सरकारचे प्रयत्न असून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून आमसभा घेतल्या जाण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी आपण सकारात्मक असून सध्याची बंदी पुर्णतः फसली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. कोरोना काळ संपल्यावर यासंबंधी तातडीने निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे असे उफराटे निर्णय मागील काळात घेतले गेले होते ते बदलणार असल्याचे सांगत गेल्या काही महिन्यात 7 कोटींची दारू जप्त झाली असून बंदी लागल्यापासून दारू तस्करी अनिर्बंधपणे सुरू असल्याचे ते म्हणाले.




























































