
देवरुख परिसरात मागील काही दिवसात कोरोनाचा फैलाव वाढत असून मोठ्या संख्येने कोरोाबाधित रुग्ण आढळत आहेत. यामुळे खबरदारी म्हणून व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर बाजारपेठमधील सर्व व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन पाळला होता. तो यशस्वी करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य केले.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून व्यापाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


































































