ज्येष्ठांची काळजी सोपे उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठांच्या आहाराची जास्त काळजी घ्यायला हवी. आहारात पालेभाज्या, फळे, डाळी यांचा समावेश असला पाहिजे. तसेच अंडय़ाचा पांढरा भाग, वेगवेगळ्या भाज्यांचे सूप घ्यायला हवे. तसेच दिवसातून तीन लिटर पाणी त्यांनी प्यायला हवे. त्यासाठी समोर पाण्याने भरलेली बाटली ठेवावी. म्हणजे पाणी पिण्याचे त्यांच्या लक्षात राहील.

  • ज्येष्ठांची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढायला हवी, ज्यामध्ये कोरोना हा आजार कव्हर होईल.
  • ते नियिमत घरच्या घरी व्यायाम करू शकतात असे व्यायाम प्रकार त्यांच्याकडून करून घेणे.
  • त्यांचा मेंदू क्रियाशील राहण्यासाठी कॅरम, ल्युडो, सुडोकू, चेस असे खेळ खेळावेत.
  • त्यांना सर्दी-खोकला वाटल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांचे तापमान, ऑक्सिजन तपासणे.
  • आजकाल अनेक ज्येष्ठांकडे स्मार्टफोन असतात. अशा वेळी त्यांच्या मोबाईलमध्ये ‘आरोग्य सेतू ऍप’ डाऊनलोड करून देणे.
  • एकटेपणा वाटत असल्यास मित्रमंडळींना व्हिडीओ कॉल लावून देणे.
  • आजूबाजूला एकटे ज्येष्ठ राहत असतील तर त्यांची अधूनमधून चौकशी करणे, त्यांना काय हवे नको ते आणून देणे.