
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे मूळचे गोव्याचे. ते पुण्यात आले आणि पुण्याचेच झाले. गिरीश बापट यांनी क्लेम केला की, माशेलकर हे आमचे आहेत. पुणे हे शहरच असे आहे की सगळ्यांनाच असे वाटते की, येथे स्थायिक झाले पाहिजे. सर्वार्थाने प्रगतीचे शहर आहे. परंतु, मी कोल्हापूरला परत जाणार. विशेषतः माझे जे विरोधक आहेत त्यांना हे सांगून टाका, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.































































