
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पार पडला. एकूण 43 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, तर 12 मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसमधून भाजपात आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचीही वर्णी लागली. त्यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र शपथविधी झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले आणि हॅकरने त्यांचे मोदींविरोधातील जुने व्हिडीओ अपलोड केले.
बुधवारी रात्री 12 वाजून 23 मिनिटांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे अकाउंट हॅक झाले. हॅकरने ज्योतिरादित्य शिंदे यांचे जुने भाषण फेसवुक वॉलवर पोस्ट केले. या भाषणात ते मोदींचा खरपूस समाचार घेताना आणि सरकारवर हल्ला चढवताना दिसत आहेत. ज्योतिरादित्य यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या वॉलवर हे व्हिडीओ दिसल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली. अखेर हे हॅकरचे काम असल्याचे समोर आले.
हॅकरला रोखण्यासाठी सायबर टीम सक्रिय झाली आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये अकाउंट पूर्वव्रत करण्यात आले. तसेच अपलोड करण्यात आलेले व्हिडीओही उडवण्यात आले. सोशल मीडियावर याची चर्चा असताना ग्वालियर पोलिसांनी मात्र याची माहिती नसल्याचे सांगितले. परंतु ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक कृष्णा घाटगे यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिल्याचे ‘दै. भास्कर’ने म्हटले आहे.
मंत्रीपदाची शपथ घेताक्षणीच नवे आरोग्यमंत्री ट्रोल व्हायला सुरुवात
वडिलांनी सांभाळलेले खाते ज्योतिरादित्य यांना मिळाले
ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलीव आहे. योगायोग म्हणजे 30 वर्षांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांनीही नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम केले होते.





























































