
या आर्थिक वर्षात देशातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याच्या प्रयत्नात आहे. या वर्षात एलआयसीचा आयपीओ आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एलआयसीच्या ड्राफ्ट प्रॉस्पेक्ट्सबाबतच्या आढाव्याचे आणि प्रक्रियेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. एलआयसीचा आयपीओ लवकरात लवकर आणण्यासाठी सेबीने आवश्यक प्रक्रिया तीन आठवड्यात पूर्ण करावी, असे केंद्राने म्हटले आहे. साधारणपणे या प्रक्रियेसाठी 75 दिवस लागतात.
या आयपीओसाठी 10 बँकर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच याबाबतची कोणतीही माहिती किंवा शंकांचे निरसन करण्यासाठी ते तयार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच एलआय़सी आयपीओबाबत पारदर्शी आणि सुयोग्य ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस सादर करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारने आता निर्गुंतवणुकीसाठी सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या आयपीओवर लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या फक्त एलआयसीच्या आयपीओवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून इतर योजनांवर नंतर विचार करण्यात येणार आहे. सध्या एलआय़सीच्या आयपीओलाच प्राधान्य देण्यात येत आहे, असे सरकारने म्हटले आहे.
येत्या काही दिवसात सरकारकडून सेबीला ड्राफ्ट प्रॉसपेक्टसचे दस्तावेज सादर करण्यात येणार आहेत. सरकारने अनेकदा एलआय़सीच्या लिस्टिंगबाबतचे विचार स्पष्ट केले आहेत. तसेच याचा आयपीओ लवकरात लवकर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. एलआय़सीचा आय़पीओ यशस्वी होण्यासाठी एलआय़सीकडूनही प्रयत्न करण्यात येत आहेत.
देशातील एकूण विमा पॉलिसीत एलआय़सीचा 65 टक्के वाटा आहे. ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. तसेच गेल्या वर्षात अनेक आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाल्याने एलआयसीच्या आयपीओलाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. तसेच अनेक गुंतवणूकदारही एलआयसीच्या आय़पीओची प्रतीक्षा करत आहेत.




























































