भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, तरुणीचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरुम व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबध ठेवल्याचा आरोप पीडितेने केला असून याप्रकरणी मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर तरुणीने बेडरुममधील व्हिडीओ शेअर करत हा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

तरुणीच्या या आरोपामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेल्याच आठवड्यात ही तरुणी आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवीत असल्याची तक्रार देशमुख यांनी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात केली होती.

दरम्यान, पीडित तरुणीच्या आरोपानंतर भारतीय जनता पक्षाने देशमुख यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला आहे आणि तो तडकाफडकी मंजूर देखील करुन टाकला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

‘भाजपा सोलापूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष या पदाचा श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्याने हा राजीनामा मी स्वीकारला आहे’, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली असून आरोप करणारी तरुणी ही भाजपची पदाधिकारी असल्याचे समोर येत आहे.