धक्कादायक! पत्नीची हत्या करून मृतदेह कढईत उकळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीची हत्या केल्यानंतर एका व्यक्तीने तिचा मृतदेह कढईत उकळल्याची घटना पाकिस्तानात घडली आहे. हा प्रकार करत असताना घरात असणाऱ्या आपल्या सहा मुलांना पाहूनही या आरोपीला दया आली नाही. त्याने पत्नीचा मृतदेह कढईत टाकून मुलांसमोर उकळला. पाकिस्तानातील कराची शहरातील गुलशन-ए-इक्बाल भागात ही घटना घडल्याचीव माहिती मिळत आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पोलिसांना नर्गिस नावाच्या महिलेचा मृतदेह परिसरातील एका खाजगी शाळेच्या स्वयंपाकघरात एका कढईत सापडला. आरोपी पती हा त्याच्या पत्नीला इतर पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असे. मात्र पत्नीने त्यास नकार दिल्याने पतीने तिचा खून करून मृतदेह जाळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्गिसचा पती आशिक हा बाजौर एजन्सी येथील रहिवासी असून तो शाळेत चौकीदार म्हणून काम करत होता. तो जवळपास आठ ते नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळेतील नोकर क्वार्टरमध्ये राहत होता. हत्या झाल्यानंतर नर्गिसच्या 15 वर्षांच्या मुलीने पोलिसांना फोन करून माहिती दिली. ही हत्या केल्यानंतर आरोपी आशिक हा आपल्या तीन मुलांसह फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आशिकचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी आरोपीच्या इतर तीन मुलांना त्यांच्याकडे ठेवले आहे. या घटनेमुळे मुले अत्यंत घाबरली असून आणि त्यांना मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय आणि कायदेशीर औपचारिकतेसाठी पोलिसांनी नर्गिसचा मृतदेह जिना पदव्युत्तर वैद्यकीय केंद्रात नेला आहे. या घटनेमागची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. मुलांच्या जबाबावरून असे कळून आले आहे की आरोपीने आपल्या पत्नीला कढईत उकळण्यापूर्वी तिचा उशीने गळा दाबला. महिलेचा एक पायही तिच्या शरीरापासून विलग झालेला आढळून आला. मीडिया रिपोर्ट्सच्या अंदाजानुसार आशिकने नर्गिसला इतर पुरुषांशी अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि तिने तसे करण्यास नकार दिल्यावर त्याने तिची हत्या केली.