
महालक्ष्मी रेसकोर्स येथे झाड अंगावर कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या दुर्घटनेत ठाणे येथे राहणारे साईयोग मनोहर पवार (38) हे गंभीर जखमी झाले. त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
महालक्ष्मी डॉ. ई-मोजेस रोड, रेसकोर्सजवळ उभ्या असलेल्या गाडीवर दुपारी 4 वाजताच्या सुमारास झाड कोसळले. या दुर्घटनेत पवार हे गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना पालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉ. गौरव कदम यांनी सांगितले.




























































