
बॉलिवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमीर खान आपला मुलगा आझाद आणि विभक्त पत्नी किरण राव यांच्यासोबत फिफा विश्वचषक लढती पाहण्यासाठी कतारला गेला होता. त्याचा छोटा मुलगा आझाद हा मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा मोठा चाहता आहे. कतारच्या लुसेल स्टेडियमबाहेर हिंदुस्थानी चाहत्यांनी आमीरला ओळखले आणि त्याच्यासोबत काढलेल्या सेल्फीचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. आमीर हा फुटबॉलचा केवळ फॅन नसून हा खेळ खेळायलाही त्याला मनापासून आवडते. त्यामुळेच चित्रपटांच्या चित्रीकरणातून वेळ मिळाल्यावर तो सहकुटुंब फॅमिली सहलीसाठी कतारला गेला होता.




























































