
गेल्या 15 दिवसांपासून प्रचाराचा धुराळा उडालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचे कारभारी उद्या निश्चित होणार आहेत. त्या-त्या तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होणार असून, कुणाच्या खांद्यावर विजयाचा गुलाल पडणार आणि कोण पराभूत होणार यावरून पारापारावर पैजा लागल्या आहेत. सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सांगली जिह्यातील 432, नगर जिह्यातील 203, कोल्हापूर जिह्यातील 474, सातारा जिह्यातील 259, सोलापूर जिह्यातील 189 ग्रामपंचायतींसाठी रविवारी चुरशीने पण शांततेत मतदान पार पडले. यातील काही ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुका पार पडल्या आहेत. दरम्यान, सर्वपक्षीयांनी विजयाचे दावे केले असले, तरी मतदारराजाने कुणाला कौल दिला, हे उद्याच समजणार आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नगर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून जिह्यातील 195 ग्रामपंचायतींसाठी तालुक्याच्या सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठsची केलेली निवडणूक रविवारी किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात होणार आहे.
सांगली जिह्यातील 416 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे. मिरज तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींची 22 टेबलांवर 8 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलावर होणार आहे. तासगाव तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींची 15 टेबलांवर 7 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी तीन टेबलांवर होणार आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींची 15 टेबलांवर 7 फेरीत मतमोजणी होणार आहे. जत तालुक्यातील 77 ग्रामपंचायतींची 20 टेबलांवर 15 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलावर होणार आहे.
खानापूर-विटा तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींची 16 टेबलांवर 8 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी चार टेबलांवर होणार आहे. आटपाडी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींची 15 टेबलांवर 6 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलावर होणार आहे. कडेगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींची 19 टेबलांवर 9 फेरीत मतमोजणी होणार आहे. पलूस तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची 14 टेबलांवर 7 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलावर होणार आहे.
वाळवा तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींची 30 टेबलांवर 15 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी चार टेबलांवर होणार आहे. शिराळा तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींची 15 टेबलांवर 15 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी तीन टेबलांवर होणार आहे.
सातारा जिह्यात 259 ग्रामपंचायतींसाठी 926 मतदान केंद्रांवर सदस्यपदासाठी 3 हजार 894 अन् सरपंचपदासाठी 242 जागांवर 648 जणांमध्ये थेट निवडणूक झाल़ी गावपातळीवर स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्याने या निवडणुकीमध्ये काँटे की टक्कर असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सातारा जिह्यातील 319 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यापैकी अंशतः बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 259 ग्रामपंचायतींसाठी मतदान शांततेत पार पडले. या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याने जिल्हावासीयांमधून उत्सुकता दिसून येत आहे.
सोलापूर जिह्यातील 189 पैकी 12 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, 177 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झाले. मंगळवारी होणाऱया मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात भानामती, करणीने गाजवली निवडणूक
एक एक मतांसाठी आर्जव… विनंती ते प्रसंगी लिंबू, उतारा, काळी जादू आणि भानामती अशा करणीने गाजलेल्या कोल्हापूर जिह्यातील 429 ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी लागणार आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांची धाकधूक वाढली असून, गावचा कारभार कोणाच्या हाती येणार? विजयाचा गुलाल कोणाला लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिह्यात थेट सरपंचपदासाठी एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने अशा 60 जागा तसेच 847 सदस्य यापूर्वीच बिनविरोध आले. चार ग्रामपंचायती आणि 23 जागांवर एकही उमेदवारी अर्ज आलेला नाही. त्यानंतर सरपंचपदासाठी 1 हजार 193 तर 4 हजार 402 सदस्यपदासाठी निवडणुकीच्या रिंगणातील 8 हजार 995 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतपेटीत बंद झाले होते. मंगळवारी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.































































