मध्य रेल्वे-विहंगची टाय, विद्यार्थी खो- खो स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी खासदार मोहन रावले स्मृती चषकासाठी आयोजित खो-खो स्पर्धेत पुरुष गटात बलाढय़ मध्य रेल्वे संघाच्या वेगाला ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाने 12-12 असे समान गुणांनी बरोबरीत रोखून ब्रेक लावला. विहंगला हा सामना जिंकण्याची संधी होती, पण सामना टाय झाला.

‘क’ गटात रंगतदार झालेल्या लढतीत विश्रांतीला 3 गुणांची आघाडी घेणाऱया विहंगला त्या आघाडीचा फायदा मात्र घेता आला नाही. विजय विहंगच्या दृष्टिक्षेपात होता, पण मध्य रेल्वेने आपली तीन गुणांची पिछाडी भरून काढत सामना बरोबरीत सोडवला.

‘अ’ गटात आपला सलग दुसरा विजय मिळवताना पश्चिम रेल्वेने थरारक लढतीत कुपवाडच्या राणा प्रताप मंडळाचा 1 गुणांनी पराभव केला. अष्टपैलू खेळ करणारे प्रसाद राडीये, दीपक माधव, महेश शिंदे, मजहर जमादार त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

4 फूट 11 इंच या कुमार गटाच्या सामन्यात विहंगने दत्तसेवाचा, महात्मा गांधीने वैभवचा, नवशक्तीने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा, नंदादीपने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा, ओम साईश्वरने ग्रिफिन जिमखान्याचा आणि फादर ऍग्नलने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा पराभव केला.