Mothers Day – प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली ‘गुडन्यूज’, लग्नानंतर 6 वर्षांनी अनुभवणार मातृसुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरामध्ये आज मातृदिन साजरा केला जात आहे. प्रेम देणाऱ्या, काळजी घेणाऱ्या आईचा सन्मान करण्याचा हा दिवस. याच दिवशी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आशका गोराडिया हिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. एकता कपूरच्या ‘कुसूम’ या मालिकेतील कुमुदच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली आशका आई होणार आहे.

37 वर्षीय आशका पहिल्यांदाच मातृसुख अनुभवणार आहे. लग्नाच्या तब्बल 6 वर्षांनी तिच्या घरात पाळणा हलणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिने चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. यासोबतच बाळ कोणत्या महिन्यात जन्माला येऊ शकते याचीही माहिती तिने दिली आहे.

आशका गोराडिया हिने 1 डिसेंबर 2017 रोजी सात फेरे घेतले. ब्रेंट ग्लोब याच्यासोबत तिचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला. त्यांच्या लग्नाला यंदा डिसेंबरमध्ये 6 वर्ष पूर्ण होत असून नवीन पाहुण्याच्या आगमनासाठी ते सज्ज आहेत. याची माहिती आशका हिने स्वत: 14 मे रोजी मातृदिने इन्स्टाग्रामवरून दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Brent Goble (@ibrentgoble)

आशकाने एक अॅनिमेशन व्हिडीओ शेअर केला असून यात समुद्रकिनारी दोन मोठे आणि एक छोटा मॅट टाकलेला दिसतोय. ‘बीच बेबी ऑन द वे’ असे कॅप्शन या व्हिडीओला तिने दिले आहे. मातृदिनी तुमच्यासोबत ही बातमी शेअर करताना खुप खास वाटतंय. नोव्हेंबर 2023 मध्ये घरी येणार्‍या सर्वात मोठ्या भेटीची वाट पाहत आहोत. आमच्यावरील प्रेम कमी होऊ देऊ नका. आशका आणि ब्रेंट, असेही तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

दरम्यान, याआधी लग्नानंतर ‘बॉलिवूड लाईफ’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने मातृत्वाविषयी आपले मत व्यक्त केले होते. आमच्या लग्नाला एक वर्ष झाले असून आई-वडील होण्यासाठी हे आयुष्य मोकळेपणाने जगायचे आहे. याचा आनंद घ्यायचा आहे. हा काळ सर्वात आनंदाचा असल्याचेही तिने म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)