
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचा मुद्दा उचलत त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात स्पष्ट संकेत दिले आहेत. एका घरात दोन कायदे चालू शकत नाहीत तर मग देश कसा चालेल, असे वक्तव्य त्यांनी केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी समान नागरी कायद्याबाबत विधान केले. त्यांनी सांगितले की एका देशात दोन वेगवेगळे कायदे कसे असू शकतात. याबाबत माझ्या पक्षाची भूमिका काय आहे ते सांगतोय. केंद्र सरकारने विधी आयोगाकडे (लॉ कमिशन) हा विषय सोपवला. विधी आयोगाने देशातील विविध संस्था ज्यांचा या कामात रस आहे त्यांच्याकडून काही प्रस्ताव मागवले होते. विधी आयोगाकडे 900 प्रस्ताव आलेले आहेत. त्या प्रस्तावात काय म्हटले याची माहिती मिळत नाही आणि विधी आयोगानेही जाहीर केलेले नाही. यात काय शिफारस आहे हे विधी आयोगाने समोर आणले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, समान नागरी कायद्याबाबत शीख, ख्रिश्चन आणि जैन समाजाची भूमिका स्पष्ट करावी. कारण मला काळजी एका गोष्टीची आहे की शीख समाजाचे याबाबत वेगळे मत असल्याचे माझ्या कानावर आले आहे. याबाबत मी अधिक माहिती घेतोय. पण या वर्गाला आणि त्यांच्या मलाला दुर्लक्षित करणे किंवा विधी आयोगाकडे आलेल्या शिफारशींचे त्याची नोंद न घेता याची अंमलबजावणी करणे योग्य होणार नाही. मोदींनी किंवा सरकारने याबाबत स्पष्टता मांडावी. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यासंबंधी निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
View this post on Instagram
माझ्या मनात शंका फक्त एकच आहे की जे देशाचे चित्र आहे, ते बघितल्यानंतर जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न सुरु आहेत का? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. कारण वर्षभरात लोकसभेच्या आणि मधल्या काळात काही राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. पण आजमितीला केरळपासून कश्मीरपर्यंत सत्ताधारी भाजपच्या लोकमताचा पाठिंबा काय आहे हे पाहण्याची गरज आहे. देशाचा नकाशा नजरेसमोर ठेवला तर केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार नाही. बहुसंख्या राज्यात मोदींची सत्ता नाही, याकडेही पवारांनी लक्ष वेधले.
विकेट दिलीच तर सोडणार कशी? ‘पहाटेच्या शपथविधी’बाबत फडणवीसांनी केलेल्या आरोपांना पवारांचे उत्तर
देशाचा नकाशा नजरेसमोर ठेवला तर केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार नाही. बहुसंख्या राज्यात मोदींची सत्ता नाही. काही राज्यात आमदार फोडून सरकार बनवले, असा टोलाही पवारांनी लगावला.



























































