नोस्त्रदेमसची भविष्यवाणी खरी ठरणार? 450 वर्षांपूर्वी इस्रायलबाबत वर्तवले होते भाकीत….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ते नोस्त्रदेमस यांनी सुमारे 450 वर्षांपूर्वी भविष्यवाणी केल्या आहेत. आज इतकी शतके उलटल्यानंतरही त्या तंतोतंत खऱ्या ठरत आहेत. त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जन एफ केनेडी, अमेरिकेवरील ट्विन टॉवरवरील हल्ला यासाह कोरोना महामारीबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. आता हमासने इस्रइलवर 5 हजार रॉकेटने हल्ले केल्यानंतर इस्रायलने हमासविरोधात युद्ध घोषित केले आहे. त्यामुळे या परिस्थितीत नोस्त्रदेमस यांनी इस्रायलबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नोस्त्रदेमस यांनी लेस प्रोफेटीज या पुस्तकात अनेक भविष्यवाणी लिहून ठेवल्या आहेत. 2023 मध्ये जगात मोठे युद्ध होईल आणि ते युद्ध तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ठरू शकते, अशी भविष्यवाणी नोस्त्रदेमस यांनी व्रतवली होती. जर्मनीत हिटलरचा उदय, पहिले आणि दुसरे महायुद्ध, कोरोना महामारी यासारखी त्यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. त्यामुळे इस्रायल आणि हमासमधील युद्ध ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ठरत आहे काय, अशा चर्चा आणि नोस्त्रदेमसची भविष्यवाणी यावर सोशल मिडीयावर अनेक प्रतियक्रिया येत आहेत.

इस्रायसबाबत भाकीत करताना नोस्त्रदेमस यांनी म्हटले आहे की, 2023 मध्य सात महिने चालणारे महायुद्ध होणार आहे. या युद्धात दुष्कर्म करणाऱ्या अनेकांचा खात्मा होणार आहे. तसेच या युद्धात जगातील अनेक देश सहभागी होतील, असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे नोस्त्रदेमस यांच्या या भाकीताची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे.