
मराठा आरक्षणासाठी बुधवारी आमदारांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन करत मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या आमदारांना ताब्यात घेतले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी या आमदारांनी केली आहे. यावेळी आमदारांनी मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, विशेष अधिवेशन बोलावलेच पाहिजे अशा घोषणा यावेळी या आमदारांनी दिल्या.
कैलास पाटील, राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके , बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालय परिसरात आंदोलन करत आहेत.



























































