
देवगड बंदरात मासेमारी नौकेवर कामाला असलेला युवक दीपक कृष्णा मुळ्ये याचा देवगड येथील खाडीच्या पाण्यात तोल जाऊन पडून मृत्यू झाला. 29 फेब्रुवारी रोजी सायं 7 च्या सुमारास ही घटना घडली आहे. देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेची फिर्याद ज्योती प्रकाश पवार यांनी देवगड पोलीस स्थानकात दाखल केली आहे .
दीपक मुळ्ये हे दाऊद सोलकर यांच्या अलनाहीद- 1 एक या नौकेवर नोकरी करीत होते . 29 फेब्रुवारीला सायंकाळी ७ च्या सुमारास ते नापत्ता झाले त्यांच्या मृतदेह १ मार्च सकाळी आढळून आला. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करीत आहेत.




























































