
भाजपचं पूर्वीचं राजघराणं हे जनसंघांच होतं ते आता राहिलेले नाही अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच महाराष्ट्र नासला तरी चालेल पण सत्ता आमची पाहिजे अशी भाजपची विचारधारा आहे. ही भाजपची प्रवृत्ती ठेचून काढू असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.
रवी लांडगे यांनी कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश घेतला. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपचं पूर्वीचं घराणं जनसंघाचं होते ते आता राहिलेलं नाही. मी लहान असताना जनसंघाचे बलराज मधोक बाळासाहेबांना भेटायला यायचे. ते लोक वेगळा विचार करणारे होते, वेगळ्या विचारधारेचे होते. आताचे लोक फक्त सत्ताजिहाद करणारे आहेत. कोणीही आलं तरी चालेल, काहीही करा पण सत्ता आली पाहिजे असे भाजपची भुमिका आहे. महाराष्ट्रा नासला तरी चालेल, महाराष्ट्र मेला तरी चालेल पण सत्ता आमची असली पाहिजे अशी त्यांची विचारधारा आहे. ही प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी शिवसेना म्हणून मी उभा आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आज पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे भोसरी येथील माजी नगरसेवक रवी लांडगे ह्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी उद्धवसाहेबांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. pic.twitter.com/v5WWA5bmRD
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 20, 2024
तसेच भाजप आणि संघाचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत, सत्ता आल्यानंतर देशात आणि हिंदुत्वाचं तेज वाढेल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण हिंदुत्वाला काळीमा फासण्याच काम भाजपने केले आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, आपल्यावर हिंदुत्वाचे संस्कार झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्याचे आपले संस्कार, संभाजी महाराजांचा जयजयकार करण्याचा संस्कार हे आपलं हिंदुत्व आहे. साधुसंतांनी आपल्यावर केलेले संस्कार हे आपलं हिंदुत्व आहे. या हिंदुत्वाची वाट आता कोणीही अडवू शकत नाही. भोसरी विधानसभेवर आता भगवा फडकावयला आता कोणीही रोखू शकत नाही असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.




























































