
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ देण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना दिले होते. परंतु, त्याची पूर्तता केली नाही. त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी एसटी कर्मचारी मंगळवारी दुपारी मुंबई सेंट्रल येथे जोरदार निदर्शने करणार आहेत.