मुंबईची हवा पुन्हा ‘खराब’!

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता सुधारली असताना आता पुन्हा एकदा हवेचा दर्जा खालवत चालला आहे. गोवंडीमध्ये आज एअर क्वालिटी निर्देशांक 216 म्हणजेच हवेची गुणवत्ता ‘खराब’ नोंदवली गेली आहे. शिवाय सरासरी निर्देशांकही 118 इतका नोंदवला गेल्याने हवेची गुणवत्ता ‘मध्यम दर्जाची’च नोंदवली गेली.

मुंबईत गेल्या काही दिवसात हवेची गुणवत्ता कमालीची घटल्याने पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये बांधकामांच्या ठिकाणांहून येणारी धूळ हवेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरल्यामुळे पालिकेने कठोर नियमावली जाहीर करण्यात आली. यामध्ये बांधकामाचे ठिकाणी 35 फुटांपर्यंत बंदिस्त करणे, पाण्याची फवारणी करणे, डेब्रीजची वाहतूक उघड्या वाहनातून करू नये, शेकोटी पेटवू नये अशी 29 प्रकारची प्रदूषण नियंत्रण नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे.