
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा मास्टर माइंड आणि सध्या तुरुंगात असलेल्या वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी एका व्हिडीओद्वारे केला आहे. वाल्मीकच्या एन्काऊंटरसाठी आपल्याला 5-10 कोटीपासून ते 50 कोटींपर्यंत ऑफर देण्यात आली होती, असे कासले यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
Walmik Karad : वाल्मीक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेला दुसऱ्या कारागृहात रवानगी





























































