
इस्रायलने येमेनच्या होदेइदा आणि सलिफ बंदरांवर हवाई हल्ले केले. या दोन बंदरांचा वापर शस्त्रे वाहतूक करण्यासाठी केला जात होता असा आरोप इस्रायलच्या लष्कराने केला आहे. येमेनमधील हुथी समर्थकांनी या हल्ल्याला दुजोरा दिला. इस्रायली सैन्याने बंदरांवर 30 हून अधिक बॉम्ब टाकल्याची माहिती आहे. हुथी बंडखोरांनी हल्ले थांबवले नाहीत तर त्यांचे हमाससारखे हाल करू, अशी धमकी इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी हुथी बंडखोरांना धमकावताना इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू ठेवल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा दिला. ते म्हणाले की, आमच्या सैन्याने हमासच्या मोहम्मद देईफ, याह्या सिनवार आणि हसन नसरल्लाह यांचे हाल केले तसे येमेनमधील अब्दुल मलिक अल-हुथी यांचे हाल केले जातील.