
घरी लग्नसमारंभ असल्याने उत्साहाचे वातावरण होते. मंडपात लग्नविधी सुरू होत्या. विधी झाल्यानंतर वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घातली. मात्र वरमाला होताच अवघ्या तीन सेकंदात नवरदेव जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदविकाराच्या झटक्यामुळे ल्गनमंडपातच नवरदेवाची प्राणज्योत मालवली. अवघ्या तीन सेकंदात नववधूचं कुंकू पुसलं आणि संसाराची स्वप्नं कायमचं तुटलं. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली.
जामखंडी येथील 26 वर्षीय प्रवीणचा थाटामाटात विवाहसोहळा सुरू होता. घरी सून येणार म्हणून प्रवीणच्या घरी आनंदाचे वातावरण होते. मात्र कुटुंबीयांचा हा आंद फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या विधी पार पडल्यानंतर वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घातल्या आणि तीन सेकंदातच नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेले, पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली. भावी जोडीदारासोबत सुखी संसाराची स्वप्न बघणाऱ्या मुलीचं काही सेकंदातच कुंकू पुसल्यानं वधूच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.