
मुंबई विमानतळावरून 36 परदेशी जातीचे सरपटणारे प्राणी जप्त करण्यात आले. बँकॉकडून मुंबई विमानतळावर उतरलेल्या प्रवाशाला सीमा शुल्क विभागाने कारवाई करत ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान 28 जीवंत आणि दोन मृत ऑरेंज बीयर्डेड ड्रगन जातीचे सरडे तसेच सहा व्हाईट इग्वानास जातीचे सरडे सीमा शुल्क विभागाने जप्त केले.
रविवारी रात्री मुंबई विमानतळावर उतरलेल्या या प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. त्यामुळे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली आणि त्याच्या सामानाची स्कॅनिंगद्वारे तपासणी केली असता त्याच्याकडे 36 परदेशी जातीचे सरपटणारे प्राणी आढळले. त्यानंतर रेस्क्वींक असोसिएशन फॉर वाईल्डलाईक वेल्फेअर या प्राणीमित्र संघटनेला बोलावून या सर्व प्राण्यांची सुटका करण्यात आली.