
अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने खंडणीसाठी धमकावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पीडित मुलगी ही अंधेरी येथील एका महाविद्यालयात शिकते. तिच्या सोबत तिचा मित्रदेखील त्याच महाविद्यालयात शिकतो. ते दोघे चांगले मित्र आहेत. त्याने पीडित मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला होता. तसेच तिचे काही फोटो मोबाईलवर काढले होते. त्या फोटोवरून तो तिला धमकावू लागला. जर पैसे दिले नाही तर फोटो व्हायरल करू, अशी धमकी दिली. त्या घटनेने मुलगी ही प्रचंड तणावात गेली होती. तिने याची माहिती तिच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन गुन्हा नोंद केला आहे.