
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. मात्र, कोरोनाचा धोका कायम आहे. देशात गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजार 264 वरून 6 हजार 836 वर पोहोचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण असून त्या खालोखाल गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्लीत रुग्णसंख्या आहे. कर्नाटकमध्ये गेल्या 24 तासांत सर्वाधिक म्हणजे 105 रुग्ण सापडले.
देशात जानेवारीपासून कोरोना रुग्ण पुन्हा सापडू लागले असून आतापर्यंत ही संख्या 7 हजारच्या पुढे गेली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत ही संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. केरळमध्ये सर्वाधिक 1 हजार 649 रुग्ण सापडले आहेत. केरळ पाठोपाठ गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर तर मृत्यूच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.