हल्ला अमेरिकेचा, प्रत्युत्तर इस्रायलला; चवताळलेल्या इराणनं डागली धडाधडा 30 क्षेपणास्त्र

अमेरिकेने रविवारी सकाळी इराणमध्ये घुसून हवाई हल्ले केले. इराणच्या तीन आण्विक तळांवर अमेरिकेने हल्ला करत ते उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांमुळे इराण चांगलाच चवताळला असून अमेरिकेला बदला घेण्याची धमकी दिली आहे. एवढेच नाही तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवरील हल्ले तीव्र करत धडाधड 30 क्षेपणास्त्र डागली. इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि जेरुसलेमला लक्ष्य करत ही क्षेपणास्त्र डागण्यात आली असून यात मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांची इस्रायलच्या डिफेन्स फोर्सनेही केली आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रांची लाटच सोडली. एकामागोमाग एक असे 30 क्षेपणास्त्र इस्रायलवर डागण्यात आली. इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळासह तेल अवीव आणि जेरूसलेममधील अनेक ठिकाणांना इराणने लक्ष्य केले. यात अनेक इराणींचे नुकसान झाले असून 11 जखमी झाले आहेत. या हल्ल्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून इस्रायलच्या आकाशात इराणची क्षेपणास्त्र आग ओकत असल्याचे दिसते.

इराणने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने तातडीने आणीबाणी लागू करत नागरिकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. इराणच्या हल्ल्यानंतर तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. तसेच सकाळपासून सायरन वाजत आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक इमारती कोसळल्या असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

B-2 stealth bomber – इराणमध्ये घुसून हल्ला करण्यासाठी अमेरिकेनं ‘बी-2 बॉम्बर’ विमानचं का वापरली? जाणून घ्या वैशिष्ट्य…

दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्यावर इराणने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात आण्विक तळाला कोणतेही नुकसान झाले नाही. आण्विक तळ पूर्णपणे सुरक्षित असून रेडिएशनचाही धोका नसल्याचे इराणने म्हटले. तसेच या हल्ल्यानंतर अण्वस्र कार्यक्रम सुरुच राहील असेही इराणने ठासून सांगितले.

अमेरिकेच्या हल्ल्याला जुमानत नाही, अण्वस्त्र कार्यक्रम सुरुच ठेवणार; इराणच्या भूमिकेमुळे युद्धाचा भडका उडणार