
घाटकोपरमध्ये एका 15 मजली निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घाटकोपर पश्चिम येथील LBS रोडवरील आर सिटी मॉलच्या मागे असलेल्या ऑर्किड रेसिडेन्सीच्या टॉवर क्रमांक 6 मधील चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. याची माहिती दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर पोलिसांसह, अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, स्थानिक वॉर्ड कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटानस्थळी दाखल झाल्या. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेला नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेल नाही. Times Of India ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.