
बार्शी येथील व्यापारी नीलेश केवलचंद जैन (परमार) यांनी ‘महावीर सेल्स कॉर्पोरेशन’ आणि ‘महावीर एंटरप्रायजेस’ या दोन संस्थांमार्फत 146 कोटींचे संशयास्पद व्यकहार केले. मालाचा पुरकठा न करता बनाकट बिलांद्वारे 41 कोटींचा जीएसटी बुडविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जीएसटी विभागाने नोटीस बजाविल्यानंतर जैन यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात अटकपूर्क जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
जीएसटी अधिकारी दिनेश नकाते यांनी छापा टाकून कागदपत्रे तपासली. त्यामुळे फसवणूक उघड झाली. वरिष्ठ अधिकारी सुधीर चेके यांनी जैन यांचे बँक खाते सील केले. तसेच दोन्ही संस्थांची जीएसटी नोंदणी रद्द केली. जीएसटी विभागातर्फे ऍड. महेश झंकर यांनी बाजू मांडली, तर जैन यांनी ऍड. शशी कुलकर्णी आणि ऍड. गुरुदत्त बोरगावकर यांच्यामार्फत जामिनासाठी प्रयत्न केले. प्रकरणाच्या गंभीरतेमुळे न्यायालयाने जामीन नाकारला. जीएसटी विभागाची सन 2025मधील ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्की दोन व्यापारी बंधूंवरही अशीच कारवाई झाली होती. त्याचा तपास सुरू आहे.