
प्रवासादरम्यान अनेक गोष्टी आपल्या नजरेला पडतात. त्यातील काही गोष्ट मनाला स्पर्श करून जातात. असाच एक क्षण एका दुचाकीस्वाराने अनुभवला. नाशिक-पुणे हायवेवरून जाताना दुचाकीचालकाला त्याच्या अगदी पुढे धावणारा टेम्पो दिसला. टेम्पोच नाही तर त्या टेम्पोच्या मागे लिहिलेली एक सुंदर पाटी त्याचे सतत लक्ष वेधून घेत होती, कारण त्यामध्ये ‘शरीराला आणि आई-बापाला जपा; बाकी कोणी कामाला येणार नाही हे लक्षात ठेवा’ अशी सुंदर ओळ लिहिलेली असते. ही ओळ वाचून कुणाचेही मन भरून येईल. आईबाबा ही सर्वात मोठी ताकद आहे, अशा संदेशपर या ओळी आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @mahapamahapashelke या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.