
गेल्या काही वर्षांपासून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून जगात प्रत्येक 40 सेकंदाला एक आत्महत्या होत असल्याची माहिती समोर आली आहे. 9 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस असून त्यानिमित्ताने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. जर कुणी आत्महत्या करण्याची धमकी देत असेल तर त्याला हलक्यात घेता कामा नये. त्याचे योग्य समुपदेशन झाले पाहिजे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.