पंजाबची दोन हजार गावे पाण्याखालीच

पंजाबधील 23 जिल्हे पुराच्या वेढ्यात असून तब्बल 2 हजारांहून अधिक गावे अद्याप पुराच्या पाण्याखाली आहेत. केंद्र सरकारने पंजाबसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. दुसरीकडे जम्मू आणि कश्मीरमध्ये श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज 16 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या महामार्गावर विविध ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. हरयाणात 9 सप्टेंबरपर्यंत तब्बल 46 टक्के पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस यमुना नगर येथे 1080.8 मि.मी. इतका नोंदवण्यात आल्याचे वृत्त आहे.