घरातील कांदा खराब होऊ नये… हे करून पहा

स्वयंपाक करण्यासाठी कांद्याचा हमखास वापर केला जातो. परंतु बऱ्याचदा कांदा घरात साठवता येत नाही. जास्त कांदा घरी आणल्यास तो खराब होण्याची भीती असते. जर तुम्हालासुद्धा ही भीती सतावत असेल तर यासाठी काही सोप्या टिप्स या ठिकाणी देत आहोत. सर्वात आधी कांदा साठवताना तो एकावर एक रचू नका.

कांद्याला खेळती हवा मिळेल असे पाहा. कांदा साठवण्यासाठी जागा ही कोरडी आणि थंड असावी. ओलावा असलेल्या ठिकाणी कांदा ठेवल्यास तो लवकर सडायला सुरुवात होते. कांद्याला फ्रीजमध्ये अजिबात ठेऊ नका. कांद्याचे ढीग न करता कांद्याला जमिनीवर पसरवा. त्यामुळे त्यांना हवा मिळण्यास मदत मिळते. जर कापलेले कांदे असतील तर ते वेगळे ठेवा.