गोव्याचे कृषी मंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गोव्याचे कृषी मंत्री व दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले रवी नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन बुधवारी सकाळी निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.

नाईक हे त्यांच्या फोंडा येथील निवासस्थानी झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ फोंडा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव नंतर अंत्यदर्शनासाठी फोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.

रवी नाईक यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षामधून झाली, त्यानंतर काँग्रेस व नंतर ते भाजपमध्ये आले. ते दोन वेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिले होते. ते एकूण सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तर एकदा उत्तर गोव्यातून खासदार म्हणून निवडून येत लोकसभेत गेले होते.