हिंदुस्थानकडून 2.7 मिलियन टन तांदूळ निर्यात

हिंदुस्थानने बासमती तांदळाच्या निर्यातीत एक नवा विक्रम नोंदवला आहे. या वर्षी एप्रिल ते ऑगस्टमध्ये हिंदुस्थानने 2.7 दशलक्ष टन बासमती तांदूळ निर्यात केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चार लाख टन जास्त निर्यात करण्यात आला आहे. पाकिस्तान फक्त दहा लाख टन बासमती निर्यात करतो, तर हिंदुस्थान सहा दशलक्ष टनांपेक्षा जास्त बासमती निर्यात करतो. या वेळी निर्यातदारांनी 6.5 दशलक्ष टनांचे लक्ष्य ठेवले आहे. तांदूळ निर्यातीत हरयाणाचा 35 ते 40 टक्के वाटा आहे. अमेरिकेने हिंदुस्थानातील तांदळावर 50 टक्के कर लादला आहे.